बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत युवक ठार

Tuesday, 17th January 2023 05:11:15 AM

गडचिरोली,ता.१७: सुरजागड येथील पहाडावरुन लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार युवक ठार झाल्याची घटना काल(ता.१६) रात्री ७ वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील मद्दीगुडम गावाजवळ घडली.निकेश चोखारे(३०) रा. लक्ष्मणपूर ,ता.चामोर्शी असे मृताचे नाव आहे.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखाणीतून लोहखनिज उत्खनन करण्याचे काम लॉयड मेटल्स अॅंड एनर्जी व त्रिवेणी अर्थमूव्हर्स या दोन कंपन्या संयुक्तपणे मागील दीड वर्षांपासून करीत आहेत. दररोज पहाडावरुन लोहखनिज नेणारे शेकडो ट्रक सुरजागड-एटापल्ली-अहेरी-आष्टी मार्गे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दिशेने धावत असतात. यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी सुरजागड ट्रकच्या अपघातात लगाम गावाजवळ एक महिला ठार झाली होती. त्यावेळी नागरिकांनी १० ट्रक पेटवून दिले होते. वारंवार घडणारे अपघात आणि खराब रस्ते यामुळे नागरिक संतापलेले असतानाच काल एका ट्रकने निकेश चोखारेचा बळी घेतला.

निकेश हा लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीमध्येच चालक म्हणून कार्यरत होता. पत्नी ८ महिन्यांची गरोदर असल्याने तिच्या उपचारासाठी तो रजा घेऊन गावी गेला होता.परंतु पत्नीला दवाखान्यात भरती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने आणि रजा संपल्याने पुन्हा रजा घेण्यासाठी तो काल कंपनीच्या मद्दीगुडम येथील कार्यालयात गेला. तेथून परतताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यास जोरदार धडक दिली. यात तो घटनास्थळीच गतप्राण झाला. या प्रकरणी अहेरी पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. आज दुपारी निकेशच्या पार्थिवावर लक्ष्मणपूर या त्याच्या स्वगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

……..

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4196W
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना