शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

बिबट्याची शिकार; तीन जणांना अटक

Wednesday, 18th January 2023 06:00:44 AM

गडचिरोली,ता.१८: कुरखेडा तालुक्यातील पुराडा वनपरिक्षेत्रांतर्गत रामगड गावानजीकच्या जंगलात बिबट्याची शिकार केल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी वनाधिकाऱ्यांनी तीन जणांना अटक केली आहे. आरोपींकडून बिबट्याच्या कातड्यासह ११ नखे जप्त करण्यात आली आहेत.

विनायक मनिराम टेकाम(३०), रा.वागदरा, मोरेश्वर वासुदेव बोरकर(४५),रा.रामगड व मंगलसिंग शेरकू मडावी(५०) रा.वागदरा, ता.कुरखेडा अशी आरोपींची नावे आहेत. मंगळवारी(ता.१७) रामगडनजीकच्या जंगलात बिबट्याची शिकार करण्यात आल्याची माहिती मिळताच गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर, वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धनंजय वायभासे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरखेड्याचे उपविभागीय वनाधिकारी मनोज चव्हाण, पुराड्याचे वनपरिक्षेत्राधिकारी बालाजी डिगोळे, क्षेत्रसहायक संजय कंकलवार, कामचंद ढवळे, बिटरक्षक भरत रामपूरकर, अमर कन्नाके, श्यामराव कुळमेथे, सुरेश रामटेके, सुनंदा मडावी, गंगाधर मेने, गंगाधर नन्नावरे यांनी सापळा रचून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे आणि ११ नखे जप्त करण्यात आली आहेत.

आरोपींवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये वनगुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने आरोपींना ७ दिवसांची वनकोठडी सुनावल्याची माहिती उपवनसंरक्षक धनंजय वायभासे यांनी दिली. या घटनेत वन्यजीवांची शिकार करणाऱ्या सराईत टोळीचा सहभाग असण्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

…………………


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
SEA6U
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना