/* */
शुक्रवार, 27 जानेवारी 2023
लक्षवेधी :
  झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध नाट्यकलावंत डॉ.परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर             गडचिरोली पोलिस दलातील २९ अधिकारी व जवानांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक जाहीर           

‘उमेद’च्या प्रक्रिया उद्योगाला भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

Monday, 23rd January 2023 01:26:53 AM

गडचिरोली,ता.२३: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) कुरखेडा तालुक्यातील रामगड येथील प्रकिया उद्योगाच्या युनिटला काल रात्री भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांची यंत्रसामग्री व अन्य साहित्य जळून खाक झाले.

उमेद प्रकल्पांतर्गत जिल्हाभर महिला बचत गट कार्यरत असून, अनेक बचत गट फळे आणि वनोजपजावर आधारित प्रक्रिया उद्योग चालवीत आहेत. असेच जांभूळ व सीताफळ प्रक्रिया उद्योगाचे युनिट रामगड येथे आहे. परंतु मध्यरात्री या युनिटला अचानक भीषण आग लागली. पहाटे आग लागल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. कुरखेडा येथून अग्निशमन वाहनही बोलावण्यात आले.परंतु तोपर्यंत बॅटऱ्या, यंत्रे, कॅरेट, पल्प, बिया, फर्निचर आणि कागदपत्रे जळून खाक झाली होती. या आगीमुळे उमेदचे सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

प्रकिया उद्योगामुळे शेकडो महिलांना रोजगार मिळाला असून, त्या स्वयंभू झाल्या आहेत. मात्र, आग लागल्याने त्यांचा रोजगार हिरावला गेला आहे. ही आग कशामुळे लागली, हे अद्याप कळू शकले नाही. कुणी जाणीवपूर्वक तर आग लावली नाही ना, याविषयीचे सत्य पोलिस तपासात पुढे येईल. आज सकाळी जीवनोन्नती अभियानाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याविषयी पुराडा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याची माहिती जिल्हा अभियान व्यवस्थापक प्रफुल्ल भोपये यांनी दिली.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
AXWS8
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना