/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता. २१: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह बहाल केल्याच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीप्रमुख छाया कुंभारे यांच्या नेतृत्वात गडचिरोली येथे केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात निदर्शने करण्यात आली.
केन्द्र सरकारच्या दबावात येऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला मूळ पक्षाचे नाव व चिन्ह बहाल केले, असा आरोप छाया कुंभारे यांनी केला. यावेळी महिला शिवसैनिकांनी घोषणा देत निवडणूक आयोगाचा निषेध केला.
या आंदोलनात माजी जि. प. सदस्य तथा उपजिल्हा संघटिका सुनंदा आतला, तालुका समनव्यक नूतन कुंभारे, शहर समनव्यक स्वाती दासेवार, उपशहर संघटिका सीमा परासर, शाखाप्रमुख ज्योत्स्ना राजूरकर, शाखाप्रमुख देवकी कंकडावार, गीता सोनूले, संध्या हेमके, कारवाफाच्या सरपंच महानंदा आतला, प्रभारी तालुका प्रमुख आरती खोब्रागडे सहभागी झाल्या होत्या. ......