/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.४: केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरची भाववाढ केल्याच्या विरोधात आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीने इंदिरा गांधी चौकात निदर्शने करुन केंद्र सरकारचा निषेध केला.
महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका छाया कुंभारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. पूर्वी साडेतीनशे रुपयांत गॅस सिलिंडर मिळत होते. परंतु केंद्रात मोदी सरकार आल्यापासून अनेकदा सिलिंडरची भाववाढ करण्यात आली.आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थींनाही ११०० रुपये भरुन सिलिंडर घ्यावा लागतो. एकूणच मोदी सरकार गोरगरिबांच्या विरोधात निर्णय घेत असल्याने या सरकारचा निषेध करीत असल्याचे छाया कुंभारे यावेळी म्हणाल्या.
या आंदोलनात जोत्सना राजूरकर, नूतन कुंभारे, देवकी कंकडालवार, आरती खोब्रागडे, रिंकू वासलवार, संध्या हेमके, रिहानी दीक्षित, माधुरी राजूरकर, सुलभा राजुरकर, रेखा कुमरे, यामिना आलाम, सपना मेश्राम, संगीता रामटेके, अपुर्वा कटकवार,श्रीमती क्षीरसागर यांच्यासह अन्य महिला सहभागी झाल्या होत्या.