/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१०: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल(ता.९) रात्री भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलिस मदत केंद्रांतर्गत मर्दहूर गावच्या एका उच्चशिक्षित युवकाची गोळ्या घालून हत्या केली. साईनाथ नरोटे(२६) असे मृत युवकाचे नाव आहे.
साईनाथ नरोटे हा गडचिरोली येथे स्पर्धा परिक्षेची तयारी करीत होता. होळी सणानिमित्त तो मर्दहूर या आपल्या गावी गेला होता. मात्र, गुरुवारी रात्री नक्षल्यांनी गावाबाहेर नेऊन गोळ्या घालून त्याची हत्या केली. आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पोलिस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांनी या घटनेस दुजोरा दिला आहे. मृत साईनाथ हा पोलिसांचा खबऱ्या नव्हता. तो गडचिरोली येथे राहून स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता. असे असताना नक्षल्यांनी एका निरपराध युवकाची हत्या केली, असे श्री. नीलोत्पल म्हणाले.