/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१०: महिलांनी अन्याय, अत्याचाराचा संघटीत होऊन मुकाबला करावा. शिवाय सामाजिक व राजकीय क्षेत्रातही भरारी घ्यावी, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा संघटिका छाया कुंभारे यांनी केले.
शिवसेनेच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य सुनंदा आतला, अंजली वैरागडवार, स्मिता नैताम, देवकी कंकडालवार उपस्थित होत्या. श्रीमती कुंभारे पुढे म्हणाल्या, देशात अनेक बदल होत असल्याचे भान महिलांनी ठेवले पाहिजे. गॅस सिलिंडर व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. याविरुद्ध आवाज उठवून महिलांनी ईव्हीएम हटाव, देश बचाव हा नारा बुलंद करावा, असे आवाहनही कुंभारे यांनी केले. यावेळी अतिथींचीही भाषणे झाली.
याप्रसंगी बालके आणि महिलांची संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. बालकांच्या स्पर्धेत साई राजुरकर याने प्रथम, तर आरव दुधे याने द्वितीय क्रमांक पटकावला. तृषा खोब्रागडे व जान्हवी गावडे यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. महिलांच्या स्पर्धेत पौर्णिमा खोब्रागडे यांनी प्रथम, तर गीता सोनुले यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. बाजीराव मस्तानी या खेळात सीमा पाराशर प्रथम, तर उषा शेंडे द्वितीय पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या. नलीनी बोरकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.कार्यक्रमाचे संचालन स्वाती दासेवार, तर आभार प्रदर्शन ज्योत्स्ना राजुरकर यांनी केले.
कार्यक्रमाला तालुका समन्वयक नूतन कुंभारे, तालुका प्रभारी संघटिका आरती खोब्रागडे, शाखाप्रमुख सीमा पाराशर, संध्या हेमके, रोहिणी दीक्षित, रिंकू वासलवार, सुषमा राजुरकर, शालीनी दुधे, वैशाली नंदनवार, प्रमिला सहारे, अनिता राऊत, शालीनी गोडे, रंजना मिसार, संतोषी काळबांधे, शीला सराफ यांच्यासह अन्य महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.