/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१२: भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या शहर शाखेच्या वतीने आजग डचिरोली येथे जागतिक महिला दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते परिश्रम घेऊन कुटुंबाचे पालन-पोषण व मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या २४ होतकरू महिलांना देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या नावाने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेश सदस्य बाबूराव कोहळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, माजी जिल्हा परिषद सभापती रंजिता कोडापे, महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके,ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, वच्छला मुनघाटे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविता उरकुडे, मांडवगडे, छाया श्रीपदवार, शहर महामंत्री रश्मी बाणमारे, शहर उपाध्यक्ष विवेक बैस, युवा नेते संजय मांडवगडे प्रामुख्याने उपस्थित होते.
शहरातील निराधार,विधवा व गरीब महिलाज्या भाजीपाला विक्री, शिवणकाम,किराणा दुकान किंवा भांडीधुणीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत तसेच मुलांना शिक्षण देत आहेत; अशा २४ महिलांचा सत्कार करण्यात आला.यावेळी काही शहिदांच्या विधवा पत्नींनी आपण किती कठीण परिस्थितीत मुलांचे पालन पोषण व शिक्षण केले, याची हकीगत सांगितली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कोमल बारसागडे, ओबीसी आघाडीच्या शहर अध्यक्ष अर्चना निंबोड, पूनम हेमके, नीता बैस, ज्योती बागडे, भावना कुळसंगे यांनी सहकार्य केले.