मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

‘मेक इन गडचिरोली’च्या नावावर फसवणुकीचा आरोप: पीडितांचे उपोषण

Tuesday, 14th March 2023 07:41:23 AM

गडचिरोली,ता.१४: ‘मेक इन गडचिरोली’ संकल्पनेच्या नावाखाली गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी श्रीनिवास दोंतुला यांच्यासमवेत युवक व महिलांची कोट्यवधींनी फसवणूक केली. मात्र, या विषयीची तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने पीडित लाभार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून उपोषण सुरू केले आहे.

२०१७ मध्ये भाजपचे गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी 'मेक इन गडचिरोली' या संकल्पनेद्वारे शंभर दिवसांत शंभर उद्योग उभारण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी जिल्ह्यात उद्योग यात्राही काढली होती. पुढे या संकल्पनेनुसार, जिल्ह्यातील युवकांना मत्स्योत्पादन, कुकुटपलान, राईस मील, जेसीबी खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करुन देणे,अगरबत्ती प्रकल्पासाठी एमआयडीसी परिसरात भूखंड १०० टक्के अनुदानावर मिळवून देणे इत्यादी कामे करुन देण्याचे आश्वासन बेरोजगारांना देण्यात आले.

या आमिषाला बळी पडून अनेक गरजू नागरिकांनी आपल्या मेहनतीची रक्कम जमा केली. काहींनी खासगी कर्ज काढून उद्योग उभारण्यास सुरुवातही केली. परंतु पुढे घडले भलतेच.आमदार डॉ.होळी यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे लाभार्थींना शंभर टक्केअनुदान मिळालेच नाही. उलट लाभार्थींच्या नावावर लाखांची उचल करण्यात आली. अगरबत्ती उद्योग प्रकल्पातील प्रत्येक महिलेच्या नावावर २ लाख रुपयांचे कर्ज उचलण्यात आले. आता बँकेचे कर्मचारी कर्ज वसूल करण्यासाठी लाभार्थीकडे तगादा लावतआहेत. यावरुन फसगत झाल्याचे लक्षात येताच लाभार्थींनी त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत करण्याची मागणी योजनेचा व्यवस्थापक श्रीनिवास दोंतुला आणि आमदार डॉ. होळी यांच्याकडे केली. मात्र, ते पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहेत. आमदार डॉ.होळी यांनी आमची फसगत केल्याने आमचे संसार उघड्यावरपडले असून,आमदारडॉ. देवराव होळी व श्रीनिवास दोंतुला यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. परंतु अद्याप कारवाई न झाल्याने लाभार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

लाभार्थींचे आरोप राजकीयहेतूनेप्रेरित:आ.डॉ.देवराव होळी

लाभार्थींनी केलेले आरोप आणि उपोषणासंदर्भात आ.डॉ.देवराव होळी यांना विचारणा केली असता, त्यांनी लाभार्थींचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगितले. आपण गडचिरोली जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळावी म्हणून प्रयत्न केला होता. यातून कोणाचीही फसवणूक केली नाही.तरीही काही नेत्यांच्या इशाऱ्यावर लाभार्थी आंदोलन करीत आहेत. निरर्थक आरोप करणाऱ्या ३० जणांवर न्यायालयात प्रत्येकी एक कोटीचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे, असेही आ.डॉ.होळी म्हणाले.

  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
FAVGR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना