/* */
रविवार, 26 मार्च 2023
लक्षवेधी :
   पोलिसांनी हुडकून काढली नक्षल्यांनी पुरुन ठेवलेली स्फोटके: भामगरा तालुक्यातील नेलगुंडा येथील घटना             अहेरी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के: तेलंगणातील कागजनगरनजीकच्या दहेगावजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू           

जहाल नक्षलवाद्यास अटक: गडचिरोली पोलिसांची कारवाई

Wednesday, 15th March 2023 08:18:12 AM

गडचिरोली, ता. १५: नक्षलवाद्यांच्या 'टीसीओसी' सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी एका जहाल नक्षल्यास अटक केली आहे. प्रकाश उर्फ देविदास उर्फ आडवे मुरे गावडे (२७) रा.मर्दहूर,ता. भामरागड असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.

फेब्रुवारी ते मे या काळात नक्षलवादी 'टीसीओसी' ('टक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन') साजरा करतात. या दरम्यान ते मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया घडवून आणतात. ९ मार्चच्या रात्री भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलिस मदत केंद्रांतर्गत मर्दहूर या गावचा सुशिक्षीत युवक साईनाथ नरोटी याची नक्षल्यांनी गोळी झाडून हत्या केली होती.या घटनेत नक्षली प्रकाश उर्फ देविदास गावडे व अन्य दोघांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर काल त्याला अटक करण्यात आली.

नक्षली प्रकाश गावडे हा मार्च २००० मध्ये पेरमिली दलममध्ये भरती झाला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात त्याची उत्तर गडचिरोली-गोंदिया डिव्हीजनमधील प्लाटून दलममध्ये बदली करण्यात आली.२००७-०८ मध्ये तो सेक्शन डेप्युटी कमांडर झाला. २००९ नंतर त्याने प्लाटून सेक्शन ‘ए’ आणि देवरी दलमचा कमांडर म्हणून काम केले. त्याच्यावर खुनाचे १०, चकमक ८, दरोडा १, जाळपोळीचे २ व अन्य १ असे २२ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.साईनाथ नरोटीच्या हत्येत सहभागी असलेल्या अन्य दोन नक्षलींचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

………………..


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1BFX8
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना