/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२०: येथील प्रसिद्ध विधिज्ञ कविता मोहरकर यांची महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नेत्ता डिसुजा यांनी ही नियुक्ती केली आहे.
याबाबत अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस तथा महाराष्ट्र व पंजाबच्या प्रभारी आ.ममता भूपेश यांनी नियुक्तीचे पत्र जारी केले आहे. या पत्रात गडचिरोली, ठाणे ग्रामीण, जालना, भिवंडी, औरंगाबाद, अमरावती ग्रामीण व चंद्रपूर शहर अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, ते पत्र महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांना पाठविण्यात आले आहे.
२५ जानेवारीला महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष रुपाली पंदिलवार यांचे पती संजय पंदिलवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर महिनाभरातच रुपाली पंदिलवार यांनीही महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. त्यामुळे आज अॅड.कविता मोहरकर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली.
अॅड.मोहरकर यांनी पंधरा दिवसांपूर्वीच माजी मंत्री, आ.विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अॅड.मोहरकर मागील २२ वर्षांपासून गडचिरोली येथे वकिली करीत असून, देश-विदेशातील प्रतिष्ठेच्या अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांनी पुरस्कारही पटकावले आहेत.