/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२१: आज सकाळी ८ वाजून ४२ मिनिटांनी तेलंगणा राज्यातील कागजनगरजवळ भूकंप झाल्यानंतर अहेरी तालुक्यातील महागाव(बु) येथेही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
तेलंगणा राज्यातील कागजनगरनजीकच्या दहेगाव भागात सर्वप्रथम भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल एवढी होती. जमिनीच्या ५ किलोमीटर आत भूकंपाचा केंद्रबिंदू होता. गोदावरी फोल्टमध्ये हा भूकंप झाला असून, हे क्षेत्र भूकंपप्रवण आहे, असे अभ्यासक प्रा.सुरेश चोपणे यांचे म्हणणे आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी आणि अहेरी तालुक्यातील काही गावे तेलंगणा राज्याला लागून आहेत. त्यामुळे गोंडपिपरी तालुक्यातील काही ठिकाणी आणि अहेरी तालुक्यातील महागाव परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मात्र, कोणतेही नुकसान झाले नाही, असे नागरिकांनी सांगितले. २०२१ व २०२२ च्या ऑक्टोबर महिन्यात सिरोंचा तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता अहेरी तालुक्याला फटका बसला आहे.