/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२३: पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावानजीक रस्त्याच्या कडेलगत नक्षल्यांनी पुरुन ठेवलेली शक्तीशाली स्फोटके विशेष अभियान पथकाच्या पोलिसांनी हुडकून काढली आहेत.
नेलगुंडा परिसरात प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातील नक्षलविरोधी अभियान पथकाचे जवान काल(ता.२२) सकाळी नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना त्यांना गोंगवाडा मार्गावर एक क्लेमोर माईन, तर महाकापाडी मार्गावर दोन कूकर बॉम्ब, एक लोखंडी पाईप, बॅटरी आणि तीन वायर बंडल जमिनीत पुरून असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ही स्फोटके शिताफीने बाहेर काढून बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या मदतीने ती नष्ट केली. यामुळे मोठा घातपात टळला. पोलिस अधीक्षक श्री.नीलोत्पल, अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.