/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१३: येथील पोलिस दलाच्या सायबर शाखेने विविध ठिकाणांहून चोरी गेलेले वा हरविलेले ४९ मोबाईल शोधून काढले असून, ते संबंधित व्यक्तींना परत केले आहेत.
अलीकडे मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असून, मोबाईल हरविण्याचे व चोरीचे प्रमाणही वाढत आहे. मात्र, गडचिरोली पोलिस दलाच्या सायबर शाखेने याबाबत चांगली कामगिरी केली आहे. २०२२ मध्ये सुमारे २२ लाख रुपये किमतीचे १५० मोबाईल लंपास झाले होते. सायबर शाखेने सर्व मोबाईल शोधून ते संबंधित व्यक्तींना दिले. यंदा मार्च २०२३ पर्यंत सुमारे साडेसात लाख रुपये किमतीचे ४९ मोबाईल शोधून काढण्यात सायबर शाखेच्या पोलिसांनी यश मिळविले. त्यातील ३१ मोबाईल संबंधित मालकांना देण्यात आले.
पोलिस अधीक्षक श्री.नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे, कुमार चिंता, यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर शाखेचे प्रभारी अधिकारी उल्हास भुसारी, पोलिस उपनिरीक्षक नीलेश ठाकरे, नीलेश वाघ, हवालदार वर्षा बहिरवार, संगणी दुर्गे, गायत्री नैताम, किरण रोहनकर, योगेश खोब्रागडे, सचिन नैताम यांनी ही कारवाई केली.