गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

जनाबाई जिल्ला परिसेदची सभापती झाली

Monday, 22nd May 2023 01:31:35 AM

जास्त नाई, तरी दहाक वर्स झाले असतील जनाबाई जिल्ला परिसेदची सभापती होती त. तेई असीच नाई झाली काई सभापती. बुहू कामं करत होती लोकायचे ते. गावात कोणाचा झगळा झाला क जनाबाईच सोळवाले जाये. कोणाले पोरगा झाला क पयल्यापरती जनाबाईच लाळ कराले हाजर होये. कोणी मेला क सख्खी रिस्तेदार असल्यावाणी जनाबाईच त्याच्या घरी जाऊन जोरजोरानं लळे. मनून लोकायनं तिले जिल्ला परिसेदच्या निवळणुकीले उभा केला. रतिराम, रेवनाथ, जागेस्वर, देवचंद यायनं गावात कमेटी बोलावाचा ठरवला. बकाराम चपराशानं पुकारा केलंन. लोकं जमा झाले. सरवायनं ठरवला क ‘गागरा-माती एक करु पण जनाबाईले निवळून देवू.’ झालाई तसाच. कोणी पैदल त कोणी रेंगी धरुन परचाराले गेले अनं जनाबाई बुहू मतायनं निवळून आली. मंग सत्ता बसवाची वेळ आली त जनाबाई गावातले सेंभरक लोकं घेऊन गेली. जो, तो मने, ‘आमाले पैशे नाई पाहाजत. पण, जनाबाईले सभापती बनवत असाल त तुमासंग बसतून. नाई त हुडूत…’

त असं करता करता जनाबाई सभापती झाली. खाताही जोरदारच भेटला. मंग काई सांगाच नोको तिचा रुबाब. कोणाची तेरवी राहो, बारसा राहो क नवस, जनाबाई तेती अेम्बिसीटर घेऊन गेलीच पाहाजे. एकवेळ का झाला जनाबाईचा रोवणा सुरु होता. तिले डंडावर जावाचा होता. डरावटले अेम्बिसीटर काहाळ मने. डरावट मने, ‘म्याडम तुमच्या डंडापरेंत गाळी नाई नेवू सकत मी. माजी नवकरी जाईल’. जनाबाई डरावटवर बफरली, ‘ढोड्यात गेली तुजी नवकरी. तुले गाळी काहाळ मनतो तं काहाळ. गाळी रस्त्याच्या मेरंले ठेवून उभी. तेत्तून मी धुऱ्याधुऱ्यानं पैदल जाईन डंडावरी. पण, रस्त्यानं येणाऱ्याजाणाऱ्या लोकायले त माईत होईल सभापतीनबाईचा रोवणा सुरु आये मनून…..’

त रोवणा सरेपरेंत जनाबाई अेम्बिसिटरनच डंडावर जाये. मंग धान पाहावाले जावासाटीई अेम्बिसिटरच लागे जनाबाईले. इकळे डरावट परेशान होऊन गेला होता. पण त्याच्याकळ इलाज नोहोता.

जनाबाई सभापती झाली खरी. पण तिनं आपल्या जुन्या सवयी सोळलंन नोहोतन. कोटीई गेली अनं टायेम भेटला कं जनाबाई सिरवाईच्या नसाची डब्बी काहाळे अनं दोनई नाकपुळ्यात वहळे. नस वहळून झाला कं गुळाखूनं टोंड घासे अनं मस्त खेकारु खेकारु टोंड धुये. अधामधात कलेक्टरच्या मिटींगले गेली क तेती डबल नास्ता मांगे.

तं अस्या या जनाबाईकळ एक दिवस दोन-तीन पत्रकार गेले. ते मनाले लागले, ‘म्याडम, दिवाळीची जाहिरात पायजे तुमच्याकळून.’ जनाबाई मने,‘ कोटचा काजी, अजून बोहोणीच होवाची आये. कोणी इंजेनेअर नाई देये पैसे अनं कोणी ठेकेदार नाई येये माझ्याकळं. तो अध्येक्स एकलाच सावटते सप्पा’, थोळ्या वेळातच पत्रकार होकटाच टोंड करुन बाहेर निंगाले.

मंग क नाई लगीत दिवसानं जनाबाईले कुंडलिक नावाचा एक कार्येकर्ता भेटला. दोगं जण अॅन्टीचेंबरमधी बसले. बाजूले जनाबाईचा घरवालाई बसला हमेशावानी…! कुंडलिक मने, ‘जनाबाई तू सभापती होऊन दोन वर्स झाले, पण पैसे नाई कमवलीस. आता रायलेच किती दिवस? आतातरी कमव.’ जनाबाई मने, ‘तू तरी सांग गा कुंडलिक भाशा पैसे कमवाची आयडिया’. कुंडलिकनं झकास आयडिया सांगलंन. जनाबाईले कुंडलिकची आयडिया पटली. कुंडलिक मने, ‘जेवळे काई ढोरायचे दवाखाने आयेत न त्यायच्या बिल्डींगा तयार आयेत. आता त्यायले वाल कंपाउंड बांधून टाक. जिल्ल्यात तीनशे दवाखाने आयेत’. जनाबाईनं इंजेनियरले बोलावलंन. त्यानं इस्टेमेट बनवलंन. जनाबाई लगीत खुस झाली. ‘बापरे, बिल्डींग २० लाखाची अनं वाल कंपाउंड ४० लाखाचा. मंग तं वाल कंपाउंड बांधनाच परवडते.’ जनाबाई पीएले मने, ‘हिसोब करा बरं जी किती पैसे होतेत ते’. पीए मोबाईलच्या क्यालकुलेटरवर हिसोब कराले बसला तं आकडे मोबाईलच्या बायेर जावाले लागले. एवळा पैसा पाहून जनाबाई त चक्रावूनच गेली. वर्सभरातच पुरे कामं झाले.

पाहाता पाहाता जनाबाईकळ ढगोनसे पैसे जमा झाले. आता जनाबाईमंदी बुहू फरक पळला. काऊन क पैस्याची काई चिंताच नोहोती. पाणी पेईल तं बिस्लरीचाच अनं चुळू भरंल त त्याच पाण्यानं. नास्ता करंल ते मोठ्या हॉटेलमंदीच. हर आठ दिवसानं मॉलमंदी जाऊन जनाबाईनं काईतरी घेतलनंच पाहाजे. असा तिचा कारेक्रम सुरु झाला….

पाहातापाहात दुसरी निवळणूक जवळ आली. जनाबाई मने, पैसा काईई लागो, निवळणूक लळावाचाच. लोकायले माईत झाला. त्यायनं तिले नाटक अनं खेळायच्या उद्घाटनाले बोलावना चालू केला. दुसरा मानुस २ हजार रुपये देये त जनाबाई ५ हजार. एखांद्यानं ५ हजार देलंन क जनाबाई १० हजार देलनच पाहाजे. असा करताकरता जनाबाईनं त्या सिजनमंदी सेंभरक नाटका अनं खेळायचे उद्घाटन करुन टाकलंन. हळूहळू पैसे सराले लागले.

मंग निवळणूक आली. जनाबाईनं वाजतगायत फार्म भरलंन. परचाराले जावाले लागली. पुरे गावं हिंडून आली. ज्या गावी गेली त्या गावचे लोकं बोंबलाले लागले. एक माणूस मने, ‘होवं जनाबाई..SS तुलेच मतं देऊन आमी. मस्त कामं केलीस आमच्या गावचे तू. गावातले तीनई बोरिंग चार मईंन्यापासून बंद आयेत. दिसले नाई का तुले?’ जनाबाईनं चेहेराच मारुन देलंन. दुसऱ्या गावी गेली. तेतला माणूस मने, ’बरसातीत आमच्या गावच्या शाळेत पाण्याची धार लागते. पोरायले बसाले जागा नाई राहे. साधे कवलं नाई लावू सकलीस तू अनं त्या ढोरायच्या दवाखान्याले वाल कंपाउंड बांधून पैसा नास केलीस….होSS तुलेच मत देवून आमी.. ’ लोकायचे टोमणे आयकून जनाबाईले त चक्करच येवाचा बाकी रायला. पण तिले निवळून येवाचा होता. मंग तिनं मस्त पैसा वाटना चालू केलंन. पण लोकायनं ठरवला होता. इच्याकून पैसा घेवाचा पण मत नाई देवाचा मनून. झालाई तसाच. निकालाचा दिवस आला अनं पयलाच निकाल जनाबाईचा लागला. भकन्यारी पळली जनाबाई.

मी जनाबाईले बुहूवेळा समजवलो. जनाबाई तू फुकटचे पैसे कमवाच्या भानगळीत पळू नोको, लोकायचे कामं करत जा मनून. पण माझी गोस्ट आयकत नोहोती. आता मन्ते, जयेंत, काईच नाई रायला गा माज्याकळ. जीनगानी कसी करु मी? पण, मी तरी का करु सकतो आता? मी त बोलनाच सोळून देल्लो. कोण बोलल? बोल्ला त टोंड दिस्ते….


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
2QB1W
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना