मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गटविकास संवर्गातील ३८ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Friday, 26th May 2023 01:41:56 AM

गडचिरोली,ता.२६: ग्रामविकास विभागाने राज्यातील महाराष्ट्र विकास सेवा गट अ आणि गटविकास अधिकारी संवर्गातील ३८ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. गुरुवारी(ता.२५) यासंबंधीचा आदेश जारी करण्यात आला.

गडचिरोली येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे उपजिल्हा समन्वयक माणिक चव्हाण यांची भंडारा जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर आरमोरीचे गटविकास अधिकारी चेतन हिवंज यांची बदली झाली आहे. हिवंज यांच्या जागेवर भद्रावतीचे बीडीओ मंगेश आरेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागभिडच्या बीडीओ प्रणाली खोचरे यांची देसाईगंजच्या बीडीओ म्हणून बदली झाली आहे. अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील उपमुख्य कार्यपालन अधिकारी मधुकर वासनिक यांची चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील बीडीओ म्हणून स्थानांतरण झाले आहे.लाखांदूरचे बीडीओ जी.पी.अगर्ते यांची अकोला जिल्ह्यातील पातूर येथे समकक्ष पदावर बदली झाली आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे याप्रमाणे. कंसात सध्याचे ठिकाण आणि बदलीचे ठिकाण दिले आहे. बी.एस.कोसोदे (चोपडा,जि.जळगाव- प्रकल्प संचालक जलजीवन मिशन जळगाव), किरण सायमोते(प्रकल्प संचालक जलजीवन मिशन सातारा- प्रकल्प संचालक जलजीवन मिशन सांगली), समर्थ शेवाळे(विशेष कार्यकारी अधिकारी महसुल व दुग्धव्यवसाय मंत्री- प्रकल्प संचालक जलजीवन मिशन अहमदनगर), यशवंत भांड(बीडीओ लांजा,जि.रत्नागिरी-बीडीओ खेड, जि.रत्नागिरी),एस.एम.कुळकर्णी(प्रकल्प संचालक जलजीवन मिशन अमरावती-बीडीओ चांदुररेल्वे),एम.वाय.अभंगे(बीडीओ रेणापूर, जि.लातूर-प्रकल्प संचालक जलजीवन मिशन लातूर), नरेश भांडारकर(उपमुख्य कार्यपालन अधिकारी गोंदिया- प्रकल्प संचालक जलजीवन मिशन गोंदिया), अमोल ताकभाते(बीडीओ निलंगा, जि.लातूर-बीडीओ तुळजापूर जि.धाराधीव),महेश पाटील(बीडीओ चांदवड जि.नाशिक-बीडीओ निफाड जि.नाशिक), अमोल जाधव(बीडीओ कर्जत, जि.अहमदनगर- प्रकल्प संचालक जलजीवन मिशन सोलापूर), किशोर माने (बीडीओ पारनेर,जि.अहमदनगर-बीडीओ कोरेगाव जि.सातारा), संदीप जठार( बीडीओ मुळशी जि.पुणे-बीडीओ माणगाव,जि.रायगड), जितेंद्र देवरे(बीडीओ मालेगाव जि.नाशिक-उपमुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक),शशिकांत सोनवणे(बीडीओ जळगाव-बीडीओ साक्री जि.धुळे), अरुण मोहोड(बीडीओ मोताळा जि.बुलढाणा-बीडीओ मंगरुळपीर जि.वाशिम), मनोजकुमार हिरुडकर(बीडीओ कुही जि.नागपूर-बीडीओ सावनेर जि.नागपूर),सी.एस.राजपूत(बीडीओ खामगाव जि.बुलढाणा-बीडीओ मोताळा, जि.बुलढाणा), चेतन जाधव(बीडीओ तिवसा जि.अमरावती-बीडीओ भिवापूर जि.नागपूर),ज.तु.सूर्यवंशी(बीडीओ साक्री,जि.धुळे-बीडीओ पेठ,जि.नाशिक),राजेश जोगदंड(उपसंचालक जीवनोन्नती अभियान मुंबई-नोडल अधिकारी दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ग्रामविकास भवन मुंबई), अनुपमा नंदनवनकर(प्रकल्प संचालक जलजीवन मिशन जालना-उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक मग्रारोहयो संभाजीनगर), महेश पाटील(बीडीओ धारणी जि.अमरावती-बीडीओ कंधार जि.नांदेड),डॉ.अमिता गावडे-पवार(बीडीओ फलटण जि.पुणे-बीडीओ पुरंदर जि.पुणे),दीपक पाटील(बीडीओ सुरगाणा जि.नाशिक- प्रकल्प संचालक जलजीवन मिशन नाशिक), संदीप कराड(बीडीओ निफाड-बीडीओ पाथर्डी जि.अहमदनगर),संजय केंद्रे(बीडीओ परळी जि.बीड-बीडीओ शिरुर जि.बीड), क्रांती बोराटे(बीडीओ कोरेगाव जि.सातारा- प्रकल्प संचालक जलजीवन मिशन सातारा),प्रशांतसिंह मरोड(बीडीओ तुळजापूर जि.धाराशिव-बीडीओ उमरगा जि.धाराशिव),संजय कुळकर्णी(बीडीओ जालना-बीडीओ परतूर जि.जालना), के.व्ही.काळे(प्रकल्प संचालक जलजीवन मिशन लातूर-बीडीओ सोनपेठ जि.परभणी),जी.डी.वाडेकर(राज्य समन्वयक राज्य पाणी स्वच्छता मिशन मुंबई-बीडीओ जव्हार जि.पालघर), व्ही.एम.मोरे(बीडीओ सेलू जि.परभणी-बीडीओ मानवत जि.परभणी)

  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
S8MG4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना