/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.११: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज अहेरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नागेपल्ली येथील नागरिकांपर्यंत जाऊन ‘होऊ द्या चर्चा’ उपक्रमान्वये राज्यातील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली.
२ सप्टेंबरला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित मेळाव्यात ‘होऊ द्या चर्चा’ हा उपक्रम राबवून त्यात आपण मुख्यमंत्री असताना राज्यातील जनतेच्या विकासासाठी केलेली कामे आणि सध्याचे शिंदे सरकार जनतेचे कसे वाटोळे करीत आहे, याबाबत शेवटच्या व्यक्तीपर्यंत माहिती पोहचविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अहेरी विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिक गावागावात जाऊन पक्षाचे विचार आणि काम पोहचवीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज नागेपल्ली येथील नागरिकांपर्यंत जाऊन चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पुरुष व महिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका चंदना विष्णोई, अहेरी विधानसभा उपतालुका प्रमुख राजू मामीडवार, ज्येष्ठ शिवसैनिक अनिल सराफवार उपस्थित होते.