/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१३: शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनींशी आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या शिक्षकास पोलिसांनी अटक केली आहे. एटापल्ली तालुक्यातील हालेवारा येथील शासकीय आश्रमशाळेत हा प्रकार घडला आहे. प्रदीप तावडे असे अटकेतील शिक्षकाचे नाव आहे.
हालेवारा येथे निवासी शासकीय आश्रमशाळा असून,तेथील वसतिगृहात राहून अनेक आदिवासी मुले आणि मुली शिक्षण घेत आहेत. १२ सप्टेंबरला प्रदीप तावडे नामक शिक्षक सहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवत होता. यावेळी त्याने विद्यार्थिनींच्या जवळ जाऊन त्यांच्याशी असभ्य वर्तन केले. याबाबत सहा विद्यार्थिनींनी धाडस करुन आपल्या पालकांना माहिती दिली. त्यानंतर नजीकच्या कसनसूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी शिक्षक प्रदीप तावडे याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व विनयभंगच्या कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली.
आज प्रदीप तावडे यास अहेरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी दिली.