/* */
शनिवार, 30 सप्टेंबर 2023
लक्षवेधी :
  गडचिरोली:सिझेरियन प्रसूती झालेल्या दोन महिलांचा मृत्यू झाल्याने खळबळ             लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या घडकेत एकाच कुटुंबातील ३ जण ठार, १ जखमी-चामोर्शी येथील घटना             ३३ टक्के आरक्षण देऊन पंतप्रधानांनी महिलांचा सन्मान केला: खा.अशोक नेते यांचे प्रतिपादन           

गडचिरोली: पुरामुळे ७ मार्गावरील वाहतूक बंद, १९९ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

Saturday, 16th September 2023 08:17:48 AM

गडचिरोली,ता.१६: जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडलयाने आणि गोसीखुर्द धरणातून मोठा विसर्ग करण्यात येत असल्याने छोट्या नद्या आणि नाल्यांना पूर आला असून, गडचिरोली-आरमोरी, गडचिरोली-चामोर्शी व आष्टी-गोंडपिपरी या तीन प्रमुख मार्गांसह सात मार्गांवरील वाहतूक आज सकाळपासून ठप्प झाली आहे.

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे २२ दरवाजे  अडीच मीटरने, तर ११ दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहेत. यातून १७ हजार ३५ क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गडचिरोली नजीकच्या पाल नदीला पूर आला असून, गडचिरोली-आरमोरी मार्ग बंद आहे. शिवाय शिवणी आणि गोविंदपूर नाल्यांनाही पूर आल्याने गडचिरोली-चामोर्शी मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. वैनगंगा नदीच्या पुरामुळे आष्टी-गोंडपिपरी तसेच अहेरी-मोयाबीनपेठा, देसाईगंज वळण मार्ग, भेंडाळा-गणपूर बोरी, शंकरपूर हेटी-मार्कंडादेव-हरणघाट हे मार्गही बंद आहेत. 

दरम्यान, प्रशासनाने देसाईगंज आणि गडचिरोली तालुक्यातील १९९ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. देसाईगंज तालुक्यातील सावंगी येथील ५३, देसाईगंज शहरातील हनुमान वॉर्डातील ६७ आणि गडचिरोली तालुक्यातील कोटगल, पारडी व शिवणी येथील ७९ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5K247
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना