/* */
शनिवार, 30 सप्टेंबर 2023
लक्षवेधी :
  गडचिरोली:सिझेरियन प्रसूती झालेल्या दोन महिलांचा मृत्यू झाल्याने खळबळ             लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या घडकेत एकाच कुटुंबातील ३ जण ठार, १ जखमी-चामोर्शी येथील घटना             ३३ टक्के आरक्षण देऊन पंतप्रधानांनी महिलांचा सन्मान केला: खा.अशोक नेते यांचे प्रतिपादन           

रानटी हत्तीच्या हल्ल्यात वनविभागाचा वाहनचालक ठार

Saturday, 16th September 2023 09:30:27 AM

गडचिरोली,ता.१६: रानटी हत्तीने कर्तव्यावर असलेल्या वनविभागाच्या वाहनचालकास तुडवून ठार केल्याची घटना आज संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास देसाईगंज-आरमोरी वनपरिक्षेत्रांच्या सीमेवरील पळसगाव-डोंगरगाव रस्त्यावर घडली. सुधाकर बाबूराव आत्राम(४५) असे ठार झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे.

मागील काही दिवसांपासून देसाईगंज आणि आरमोरी तालुक्यात रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. या हत्तींनी धानपिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. काल रात्री या हत्तींनी आरमोरी तालुक्यातील शंकरनगर, पाथरगोटा गावांमधील पीक क्षतीग्रस्त केले. त्यानंतर आज दुपारी हत्तींचा कळप पळसगाव-डोंगरगाव रस्त्यावर आला होता. या हत्तींनी नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. माहिती होताच सहायक वनसंरक्षक संदीप भारती, आरमोरीचे वनपरिक्षेत्राधिकारी अविनाश मेश्राम, वनपाल, वनरक्षक व वनमजूर घटनास्थळाकडे वाहनांनी गेले. वाहनातून उतरल्यानंतर वाहनचालक सुधाकर आत्राम हे हत्तींचे व्हीडिओ काढत होते. एवढ्यात एक हत्ती त्यांच्या मागे धावला. त्याने आत्राम यांना सोंडेने उचलून पायाखाली तुडवून ठार केले. आत्राम हे यंदाच्या मार्च महिन्यातच चंद्रपूर येथून बदली होऊन वडसा वनविभागात रुजू झाले होते.

वर्षभरातील दुसरी घटना

आज रानटी हत्तीने वनकर्मचाऱ्यास ठार केले. वर्षभरातील ही दुसरी घटना आहे. ४ नोव्हेंबर २०२२ रोजी कोरची  तालुक्यातील तलवारगड येथील धनसिंग टेकाम या वृद्धास हत्तीने ठार केले होते. हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग वर्षभरापासून शर्थीचे प्रयत्न करीत आहे. परंतु त्यांना यश आले नाही. एकीकडे रानटी हत्ती आणि दुसरीकडे वाघांची दहशत अशा दोन्ही आघाड्यांवर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना लढावे लागत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
06O1Z
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना