/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
आयडी अमेरिका या डिजिटर उत्पादनांतील कंपनीने टचटोन या नावाने ब्लूटूथ वायरलेस स्पीकर आणि स्पीकरफोन भारतात आणले आहेत. ब्लूटूथची यंत्रणा असलेल्या कोणत्याही गॅझेटशी हे स्पीकर्स कनेक्ट करून त्यावर गाणी वाजवता येतात. याशिवाय यावरून मुव्हीज, गेम्स किंवा फोनकॉल्सही शेअर करता येतात. सुमारे ३३ फुटांच्या परिघात हा वायरलेस स्पीकर काम करतो. यातील स्पीकरफोनमुळे कॉन्फरन्स कॉलिंग करणेही सोयीचे होते. या स्पीकर्सची मूळ किंमत ५५०० इतकी आहे, मात्र अॅमेझॉन, ईझोनऑनलाइन यांसारख्या कमर्शियल वेबसाइट्सवरून ते ४१९९ ते ४२६२ रुपयांत खरेदी करता येतील.