/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१८: एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखाण परिसरातील अनेक गावांमध्ये लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
जागतिक स्वच्छता दिनाचे औचित्य साधून १६ सप्टेंबरला अनेक गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह गावातील अनेक पुरुष आणि महिलांनीही या उपक्रमात हिरीरीने भाग घेतला. यावेळी सर्वांनी गावांतील प्रमुख ठिकाणांची साफसफाई करुन नागरिकांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी गाव नेहमी स्वच्छ आणि निटनिटके ठेवण्याचा संकल्प सोडला.