/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१८: मुलचेरा तालुक्यातील मोहुर्ली गावालगत असलेल्या बीएसएनएल टॉवरजवळच्या खड्ड्यात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. रामलू आलाम(४०) असे मृत इसमाचे नाव असून,तो मुलचेरा येथील मूळ रहिवासी आहे.
आज सकाळी रामलू आलामचा मृतदेह एका खड्ड्यात तरंगताना आढळल्यानंतर नागरिकांनी एकच गर्दी केली. पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. रामलू आलाम हा मोहुर्ली येथील किष्ठू आत्राम यांचा घरजावई म्हणून राहत होता. मिळेल ते काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. रविवारी(ता.१७) संध्याकाळी नागरिकांनी त्याला मोहुर्ली-श्रीनगर येथील चौकात बघितले होते. परंतु आज त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचा घात करण्यात आला की त्याने आत्महत्या केली, याविषयीचा उलगडा पोलिस तपासातच होणार आहे. मृत रामलूच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे.