/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
वैरागड,ता.१९: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा बुधवारी (ता.२०) भोलू सोमनानी मित्र परिवार व गावकऱ्यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे.भोलू सोमनानी यांच्या घरासमोरील पटांगणावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
मागील २० वर्षांपासून वैरागड येथील सामाजिक कार्यकर्ते बलराम उर्फ भोलू सोमनानी यांच्या घरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. दहा दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवात मनोरंजन व प्रबोधनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. अनंत चतुदर्शीच्या आदल्या दिवशी १० ते १५ हजार नागरिकांना स्नेहभोजन दिले जाते. त्यामुळे सोमनानी यांच्या घरच्या गणपतीचे आरमोरी तालुक्यात विशेष महत्त्व आहे.
भोलू सोमनानी यांच्या गणपतीचे महत्त्व लक्षात घेता राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे गणपती दर्शन व सदिच्छा भेट देण्याकरिता सोमनानी यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. याचवेळी त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.