गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

एलजीची साऊंडप्लेट

Thursday, 26th June 2014 10:46:05 PM

स्पीकर्स म्हटले की चौकोनी खोके हे समीकरण आता मागे पडले आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार आता वेगवेगळ्या आकारांतील स्पीकर्स कंपन्या बाजारात आणत आहेत. त्यापैकी एलजीची 'साऊंडप्लेट' विलक्षण ध्वनिअनुभव देणारी आणि अतिशय कमी जागा व्यापणारी यंत्रणा आहे. ३४० वॉटच्या साऊंडप्लेटचा आकार एखाद्या डीव्हीडी प्लेअरसारखा आहे, मात्र यामुळे याच्या आवाजाच्या दर्जावर कोणताही परिणाम होत नाही. टीव्हीच्या खालील पोकळीतही सहज मावणाऱ्या सुमारे चार सेंटिमीटर उंचीच्या या साऊंडप्लेटचे सर्वात मोठे वैशिष्टय़ त्याचा आकार आहे, मात्र यातून मिळणारा आवाज त्याहूनही परिणामकारक आहे. ४.१ चॅनेलच्या या साऊंडप्लेटमध्ये दोन सबवूफर आहेत. केवळ एका वायरनिशी टीव्हीशी कनेक्ट करता येणाऱ्या साऊंडप्लेटमध्ये ब्लूटुथ यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मोबाइल, टॅब्लेटवरून थेट साऊंडप्लेटवर गाणी वाजवता येतात. या यंत्रणेची बाजारातील किंमत ३०९९० रुपये इतकी आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K404F
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना