गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

देसाईगंज येथील इंग्रजकालीन रेल्वेस्थानक

Tuesday, 22nd July 2014 09:51:35 AM

वडसा-देसाईगंज शहर पंचक्रोशीत मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येण्याला येथील रेल्वेस्थानक कारणीभूत आहे़. इंग्रजांनी आपला व्यापार वाढविण्यासाठी गोंदिया-चांदाफोर्ट हा लोहमार्ग निर्माण केला. वडसा हे या लोहमार्गावरील जंक्शन आहे. वडसा-ब्रम्हपुरी लोहमार्गावर वैनगंगा नदीवर जुना पूल आहे. हा पूल सुमारे सव्वाशे वर्षे जुना आहे. पुलावरील खांबावर 1888 सालचा उल्लेख आहे. यावरून याच काळात या मार्गावरून 'शकुंतला' रेल्वे धावली असावी, असा अंदाज लावता येतो. या पुलाला 1988 मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर तेथून रेल्वे हळूवार धावायची. त्यानंतर पुलाचे पुनरूज्जीवन करण्यात आले. पुढे 1993 मध्ये या नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात आले. 17 एप्रिल 1993 तत्कालिन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या हस्ते ब्रॉडगेजच्या कोनशिलेचे अनावरण झाले. या समारंभाला त्यावेळचे रेल्वेमंत्री के़सीलेंका व चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार विलास मुत्तेमवार उपस्थित होते.

निजामशाहीच्या काळात निजामशहाशी संघर्ष करतान आम्ही याच गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेने चांद्याला जात होतो, अशी आठवण त्यावेळी पीव्ही नरसिंहराव यांनी सांगितली होती. या मार्गावरून गोंदिया-बल्लारशहा, गोंदिया-चांदाफोर्ट, वडसा-चांदाफोर्ट या गाड्या दररोज धावतात, तर बिलासपूर-चेन्नई व यशवंतपूर-कोरबा या लांब पल्ल्याच्या गाड्या आठवड्यातून एकदा धावतात. येथील रेल्वेस्थानकावर संगणकीय आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिक थेट वडसा येथूनच लांब पल्ल्याचा प्रवास करतात. रेल्वेमुळे व्यापार वाढला असून, नागरिक दोन ते तीन राज्यांशी जोडले गेले आहेत. वडसा येथील रेल्वेस्थानक हे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक आहे़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VM002
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना