शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

सेमाना देवस्थान एक श्रदधास्थान

Tuesday, 22nd July 2014 09:54:04 AM

गडचिरोली-चामोर्शी मार्गावर गडचिरोलीपासून चार किलोमीटर अंतरावर सेमाना देवस्थान आहे. येथे हनुमानाचे मंदिर आहे. तसेच राम, लक्ष्मण व सीता यांचीही देवळे आहेत. शिवाय गणपती, शंकर, पार्वती व नागोबाच्या मूर्तीही आहे. येथे दर शनिवारी भाविक पूर्जा-अर्चा करण्यासाठी गर्दी करतात. महाशिवरात्रीला येथेही छोटीसी यात्रा भरते. अलिकडेच येथे हनुमानाची उंच मूर्ती उभारण्यात आली असून, ती नागरिकांचे लक्ष वेधून घेते. या ठिकाणी भाविकांच्या विरंगुळ्यासाठी वनविभागाने मोठे उद्यान निर्माण केले आहे. या उद्यानात मुलांना बागडण्यासाठी झुले, घसरपट्टी व अन्य साधने ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे मुले आवडीने तेथे जातात़ उद्यानात एक कक्ष उभारण्यात आला असून, त्यात गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात आढळणाऱ्या मृदा, वन्यप्राणी, पक्षी, वृक्ष, गौण वनोपज आदींची सचित्र माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुलझाडे, औषधी वनस्पती आणि पर्णकुटी यामुळे हे उद्यान नागरिकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5453C
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना