शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

कॉग्रेसच्या मुलाखतीसाठी इच्छूकांची झुंबड

Thursday, 24th July 2014 02:07:51 AM

प्रतिनिधी/गडचिरोली

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवू इच्छिणार्‍या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी पक्षाचे जिल्हा निरीक्षक आ.नदीम जावेद सोमवारी २१ जुलै रोजी गडचिरोलीत आले होते. गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी विद्यमान आमदार डॉ.उसेंडी यांच्यासह अन्य चार जणांनी मुलाखती दिल्या, तर आरमोरीत केवळ विद्यमान आमदार आनंदराव गेडाम यांनीच मुलाखत दिली.

गडचिरोली येथील बैठकीला आ. डॉ. नामदेव उसेंडी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, माजी नगरसेवक विनोद शनिवारे, नगरसेवक नंदू कायरकर, ललित बरछा, संतोष आत्राम, बाबूराव बावणे, शंकरराव सालोटकर, जि.प. सदस्य मनोहर पोरेटी, अँड.गजानन दुगा, जेसा मोटवानी, महिला काँग्रेस कमेटीच्या जिल्हाध्यक्षा भावना वानखेडे आदींसह गडचिरोली, चामोर्शी व धानोरा तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविण्यासाठी विद्यमान आमदार डॉ.नामदेव उसेंडी, सगुणा तलांडी, विलास कोडापे, जिल्हा परिषद सदस्य केसरी उसेंडी व कुसुम आलाम यांनी मुलाखती दिल्या. आरमोरी येथील बैठकीत केवळ विद्यमान आमदार आनंदराव गेडाम यांनीच मुलाखत दिली. यावरून तेथे काँग्रेसकडून दुसरा व्यक्ती इच्छुक नसल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश स.ावकार पोरेड्डीवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, काँग्रेसचे प्रदेश सदस्य रवींद्र दरेकर, हैदरभाई पंजवानी, जिल्हा परिषद सदस्य जीवन नाट, लंकेश भोयर, पंचायत समिती सभापती अशोक वाकडे, कुरखेडा पंचायत समितीच्या सभापती शामीना उईके, देसाईगंज पंचायत समितीचे सभापती परसराम टिकले, प्रभाकर तुलावी, देसाईगंज नगर परिषदेचे गटनेते शरद मुळे, शामलाल मडावी, खेमनाथ डोंगरवार, विलास ढोरे, प्रा. शशीकांत गेडाम उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
2VGV7
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना