शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

माजी नगराध्यक्ष आणि कर्मचा-यांतच रंगले मुष्टीयुद्ध

Friday, 25th July 2014 11:49:39 AM

गडचिरोली, ता.24 :एका महिलेचे अतिक्रमण काढल्याच्या मुद्यावरून मुख्याधिका-यांच्या कक्षात उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष व नगर परिषद कर्मचा-यांमध्येच मुष्टीयुद्ध रंगल्याची घटना आज (ता.२४) दुपारी 4 वाजताच्या सुमारास देसाईगंज नगर परिषदेत घडली. हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहचलले असून, सर्वत्र चर्चेचा विषय झाले आहे.

माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी हे काही कामानिमित्त आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या कक्षात आले. त्यानंतर नगर परिषदेचे आरोग्य लिपिक अशोक माडावार आले. अचानक मत्स्यबाजारातील एका महिलेचे अतिक्रमण काढल्याचा मुद्दा चर्चेला आला़ यावरून जेसा मोटवानी आणि माडावार यांच्या शाब्दिक चकमक उडाली. परंतु वाद विकोपाला जाऊन मुख्याधिका-यांच्या कक्षातच दोघांमध्ये मुष्टीयुद्ध रंगले. यामुळे मुख्याधिका-यांच्या टेबलवरील काच फुटला. लागलीच नगर परिषदेचे अन्य कर्मचारीही मुख्याधिका-यांच्या कक्षाकडे धावत गेले. यावेळी उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा यांनी मोटवानी व माडावार यांना बाजूला करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. याबाबत जेसा मोटवानी यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, देसाईगंज येथील स्व. राजीव गांधी महाविद्यालयासमोर श्रीमती सहारे यांचे अतिक्रमण काढण्यात माझा हात असल्याचे सांगून माडावार यांनी माझ्यावर हात उगारला. दुसरीकडे, मोटवानी यांनी मला शासकीय कामात गैरप्रकार करण्यासाठी दबाव टाकला, असे माडावार यांचे म्हणणे आहे. दोघांनीही एकमेकांविरूद्ध पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार दिली आहे़. रात्री उशिरापर्यंत कारवाईची प्रक्रिया सुरूच असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक सुनील जाधव यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक संदीप यादव, स्वप्नील कोळी, सहायक फौजदार अरुण जुआरे, सतीष खरकाटे तपास करीत आहेत़ दोघांमधील हे मुष्टीयुद्ध शहरात चांगलेच चर्चीले जात आहे़.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
A524F
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना