गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

पानठेला चालकांना वेठीस धरू नका

Friday, 25th July 2014 11:40:33 AM

युवा शक्ती संघटनेचा इशारा

गडचिरोली, ता.23 : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या बंदीचे कारण दाखवून अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिस प्रशासन पानठेल्यांवर धाडी घालून पानठेलाचकांना त्रास देत आहेत़ हा प्रकार तत्काळ थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू़ ,असा इशारा युवा शक्ती संघटनेने दिला आहे़.

काल (ता. 24) पोलिसांनी शहरातील 6 पानठेलेधारकांना ताब्यात घेतले होते. यामुळे शहरातील पानठेलेधारकांनी भयापोटी आपापले व्यवसाय बंद केले असून, त्यांच्यापुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे़. यासंदर्भात युवाशक्ती संघटनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. राजेश कात्रटवार व प्रा़. रमेश चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्य सरकारने गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी घातलॣ हा निर्णय योग्य आहे़. परंतु पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभाग तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची निर्मिती करणा-या कारखानदारांवर कुठलीही कारवाई न करता केवळ गोरगरीब पानठेलाचालकांवर कारवाईचा बडगा उगारत आहेत, हे अन्यायकारक आहे, असे प्रा. कात्रटवार व प्रा. चौधरी यांनी म्हटले आहे़.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
SS4IO
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना