मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

कारगील शहिदांना आदरांजली

Saturday, 26th July 2014 10:46:17 PM

गडचिरोली, ता. २६ : १९९९ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात कारगील येथे झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना गडचिरोली येथील कारगील चौकात आज(२६) सकाळी ९ वाजता आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर सोनटक्के होते. यावेळी कारगील दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते, माजी सैनिक कन्हैयासिंह बैस, सचिव प्रकाश भांडेकर, उपाध्यक्ष कालू गोवर्धन, कोषाध्यक्ष लिकेश कोडापे, सुभाष माधमशेटीवार, किशोर सोनटक्के, सुनील देशमुख, हरबाजी मोरे, नरेंद्र चन्नावार, लक्ष्मण घोंगडे, विलास जुवारे, राजू पुंडलिकर, मोतीराम हजारे, प्रफुल आंबोरकर, प्रवीण कुं भारे, प्रकाश धकाते, अनिल भांडेकर, सुनील देशमुख, योगेश बघाडे यांच्या शेकडो नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक उदय धकाते तर संचालन लिकेश कोडापे यांनी केले़  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
PWVJZ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना