गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

बसंतपूर येथील वर्गखोली बांधकामाचा खेळखंडोबा

Saturday, 26th July 2014 10:59:31 PM

तत्कालीन मुख्याध्यापकावर कार्यवाही करण्याची मागणी

गडचिरोली, ता. 26 : चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत बसंतपूर येथील जि.प.शाळेत वर्ग खोलीचे बांधकाम करताना तत्कालीन मुख्याध्यापकाने ते बांधकाम पूर्ण न करताच निधीची अफरातफर केल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समिती व गावक-यांनी केला असून संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

2012-13 या आर्थिक वर्षात बसंतपूर जि.प.शाळेत वर्ग खोली व स्वच्छतागृहाचे बांधकाम मंजूर करण्यात आले. या बांधकामासाठी प्रशासनाने 9 लाख रुपये उपलब्ध करून दिले होते. मुख्याध्यापक श्री. निखारे यांनी या बांधकामावर 4 लाख 38 हजार रुपये खर्च केल्याचे दाखविले़. मात्र, उर्वरीत 4 लाख 62 हजारांचा निधी शाळा बांधकामासाठी संरक्षित न ठेवता सदर निधीची अफरातफर करून आपले स्थानांतरण करून घेतल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे.

या संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीची बैठक 4 जुलै रोजी घेण्यात आली. समितीचे अध्यक्ष समीर गाईन यांनी शाळेचे पासबूक मागितले असता, बँक खात्यात रक्कम नसल्याचे आढळून आले. याबाबत श्री.गाईन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिका-यांकडे तक्रार केली आहे. मुख्याध्यापकावर कारवाई न झाल्यास शाळेला कुलूप ठोकून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर गाईन, उपाध्यक्ष श्रीमती बंधना रॉय, सदस्य रामपद बिश्वास, दिनबंधू सरकार, संजय मुजूमदार, बबलू सरकार, सुमित्रा मंडल, आमरी मंडल व गावककयांनी दिला आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
01V8K
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना