शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

पावसाअभावी रोवणीची कामे खोळंबली

Saturday, 26th July 2014 10:50:38 PM

गडचिरोली, ता. २६ : सतत चार-पाच दिवस पाऊस पडल्यानंतर आता पावसाने डोळे वटारल्याने रोवणीची कामे खोळंबली असून, खरीप हंगाम धोक्यात आला आहे. अहेरी परिसराकडे पावसाने पाठ फिरविल्याने तेथील शेतक-यांपुढे मोठे संकट उभेठाकले आहे़.

गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला होता. मात्र, लगेच उन्ह तापू लागल्याने शेतातील पाणी आटले आहे़.परिणामी रोवणीची कामे अर्धवट राहिली आहेत.कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यत केवळ ८ टक्केच रोवणी झाली आहे.

गडचिरोली उपविभाग अंतर्गत गडचिरोली, चामोर्शी व धानोरा व मुलचेरा तालुक्यात १६ हजार १९३ हेक्टर क्षेत्रात पेरणी (प-हे) करण्यात आली आहे. वडसा उपविभागात कुरखेडा, कोरची, आरमोरी व देसाईगंज तालुक्यात १५ हजार १३१ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. अहेरी उपविभागातील भामरागड, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा या तालुक्यात मात्र केवळ १० हजार ३११ हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EE580
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना