बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नक्षल्यांच्या शहीद सप्ताहास सुरुवात

Sunday, 27th July 2014 09:54:58 AM

दुर्गम भागात पत्रके व बॅनर, बसफे-या रद्द

गडचिरोली, ता. २८ : नक्षल चळवळीचे जनक चारु मुजुमदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 28 जुलैपासून ते 3 ऑगष्टपर्यंत शहीद सप्ताह पाळण्याचे आवाहन नक्षल्यांनी केले आहे. याबाबत नक्षल्यांनी जिल्ह्यातील दुर्गम भागात पत्रके टाकून व बॅनर बॅनर लावून बंदचे आवाहन केले आहे.या पार्श्वभूमीवर गडचिरोली व अहेरी आगारांनी दुर्गम भागातील काही बस फे-या रद्द केल्या आहेत.

दरवर्षी नक्षलवादी 28 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत शहीद सप्ताह साजरा करतात. या दरम्यान ठिकठिकाणी चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांचे स्मारक उभारण्यात येतात.शिवाय झाडे आडवी टाकून रस्ते बंद करणे व हिंसक कारवायाही केल्या जातात.यासंदर्भात रविवारी धानोरा तालुक्यातील मुरुमगाव-बेलगाव व चातगाव-कारवाफा मार्गावर शहीद सप्ताह पाळण्याचे आवाहन करणारी पत्रके आढळून आली.

शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने दुर्गम भागात नक्षल विरोधीअभियान तीव्र केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5VJV7
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना