मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

दोन वेगवेगळ्या अपघातांत तीन जखमी

Sunday, 27th July 2014 09:58:59 AM

गडचिरोली, ता. २७ : आष्टी येथे आज(ता.27)दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या.पीक-अप वाहनाने धडक दिल्याने सुधाकर रहाटे (44) रा.आष्टी हे गंभीरजखमी झाले, तर मोटारसायकलने ट्रकला दिलेल्या धडकेत सत्यवान सोनटक्के व अमर कावळे राक़ोनसरी हे जखमी झाले.

सुधाकर रहाटे हे आष्टी येथील पेपर मीलमध्ये कार्यरत आहेत़ आज दुपारी ते पेपर मीलमधून घराकडे परत येत असताना आष्टी येथून इल्लूरकडे जाणा-या लाल रंगाच्या पीक-अप वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात श्री.रहाटे गंभीरजखमी झाले. पेपर मील प्रशासनाने त्यांना तातडीने चंद्रपूर येथील डॉ.गाडेगोणे यांच्या रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. पेपर मील प्रशासनाने श्री.रहाटे यांच्या उपचारासाठी 23 हजार 500 रुपयांची सानुग्रह मदत दिली. शिवाय औषधोपचाराचा सर्व खर्च उचलण्याचे आश्वासन पेपर मीलचे सहायक व्यवस्थापक सोमदत्त यादव यांनी दिले. अपघाताप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरूध्द आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरा अपघात आज संध्याकाळी साडेसात वाजता घडला़ सत्यवान सोनटक्के व अमर कावळे हे गोंडपिपरीकडून आष्टीकडे मोटारसायकलने येत असताना आष्टी येथील शिवाजी चौकात पुढे जाणा-या ट्रकला त्यांनी धडक दिली.यात दोघेही जखमी झाले़ जखमींना सामाजिक कार्यकर्ते गणेश शिंगाडे यांनी स्वत:च्या वाहनाने ग्रामीण रूग्णालयात भरती केले़ आष्टी येथील पोलिस घटनेचा तपास करीत आहेत़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0SQD8
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना