शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

मालवाहू वाहन वैनगंगेत कोसळले

Sunday, 27th July 2014 10:00:25 AM

गडचिरोली, ता. २७ : चंद्रपूर येथून आष्टीकडे खाद्य तेलाची वाहतूक करणारे मालवाहू वाहन आष्टीनजीकच्या वैनगंगा नदीच्या पात्रात कोसळल्याची घटना घडली. आज रविवारी नौकेच्या साहाय्याने वाहनाचा शोध घेतलामात्र, त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. विशेष म्हणजे या अपघातातून वाहन चालक व क्लिनर सुदैवाने बचावले. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतनर हा अपघात उघडकीस आला.

चंद्रपूर येथून एम.एच.33/1081 क्रमांकाचे महिंद्रा पीक-अप वाहन खाद्य तेलाचे बॉक्स घेऊन आष्टीकडे येत होते. पुरामुळे वैनगंगेच्या पुलावर पाणी वाहत असल्याने वाहन नदीकाठावर अडकून पडले होते. दरम्यान शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास पुलावरील पाणी ओसरल्याने महिंद्रा पीक-अप हे वाहन पुलावरून आष्टीकडे मार्गक्रमण करू लागले.मात्र, वाहन पुलावरून डळमळीत होऊन नदीत कोसळणार असल्याचे लक्षात येताच वाहनचालक सुधाकर गटलेवार रा.बोरी ता.अहेरी व क्लिनर सुमित मनोहर मोहुर्ले यांनी वाहनातून उडी घेतली. त्यामुळे दोघेही अपघातातून सुखरूप बचावले. घटनेची तक्रार आष्टी पोलिस ठाण्यात केल्यानंतर आज रविवारी नौकेच्या साहाय्याने नदीपात्रात बुडालेल्या वाहनाचा शोध घेण्यात आला. मात्र, वाहनाचा थांगपत्ता लागला नाही. या अपघाताबाबत शंका व्यक्त केली जात आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
Y6QWR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना