शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

अल्पसंख्याक समाजात समावेश करा

Monday, 28th July 2014 05:26:14 AM

गडचिरोली, ता.२८: भारतात सिंधी समाजाचे नागरिक अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत़ परंतु या समाजातील मुलामुलींना शैक्षणिक व अन्य सवलती लागू नसल्याने ते शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या वंचित आहेत. सिंधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने अल्पसंख्याकांचा दर्जा द्यावा, अशी मागणी सिंधी एकता युवा फोरमने उपविभागीय अधिका-यांना निवेदनाद्वारे केली आहे़

निवेदनात म्हटले आहे की, सिंधी समाज भारतात ब-याच वर्षांपासून वास्तव्य करीत आहे. परंतु या समाजातील मुलामुलींना शैक्षणिक सवलती व सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. त्यांच्या विकासासाठी शासनाने आजपर्यंत कोणतीही योजना सुरू केली नाही. परिणामी या समाजाचा शैक्षणिक व आर्थिक विकास खुंटला आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सिंधी समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा द्यावा, अशी मागणी सिंधी एकता युवा फोरमने केली आहे. शिष्टमंडळात फोरमचे अध्यक्ष शिवा मुलचंदानी, अमृत मोटवानी, सुशील केशवानी, मोंटी देवानी, नितीन मलंग, गोपी नागदेवे, विजय नागदेवे, विक्की खिलवानी, सल्लू आहुजा, सोनू धामेजा, संजय वाधवानी, सतीश वाधवानी,अनिल दयलानी, हरीश परसवानी, अर्जून झुरानी, पिंकू आहुजा, दीपक नागदेवे, सन्नी लालवानी यांचा समावेश होता.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
92151
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना