गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

नक्षल्यांनी येथे उभारले शहीद स्मारक

Monday, 28th July 2014 08:03:14 PM

गडचिरोली, ता. २८: नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाच्या आजच्या पहिल्या दिवशी कोरची व धानोरा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला़ दुर्गम भागातील सुमारे २० बसफे-या बंद होत्या. अहेरी तालुक्यातील देचलीपेठा उपपोलिस ठाण्यांतर्गत सिंधा येथे नक्षल्यांनी शहीद स्मारक उभारल्याची माहिती आहे.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) या संघटनेतर्फे दरवर्षी २८ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत शहीद सप्ताह पाळण्यात येतो. आज बंदच्या पहिल्या दिवशी कोरची व धानोरा येथील बाजारपेठ बंद होती. कोरची तालुक्यातील दुर्गम गावांमध्येही बंद पाळण्यात आला. तसेच  तेथील शेती व अन्य कामेही बंद नक्षल्यांच्या दहशतीपोटी बंद होती. काळीपिवळी टॅक्सीच्या वाहतुकीलाही बंदचा फटका बसला. धानोरा येथील बाजारपेठही दुपारपर्यंत बंद होती. मात्र, व्यापा-यांनी संध्याकाळी दुकाने सुरू केली. भामरागड, एटापल्ली व सिरोंचा तालुक्यासह अन्य तालुक्यातील सर्व व्यवहार व वाहतूक मात्र सुरळीत होती. गडचिरोली आगाराने दुर्गम भागातील कसनसूर, मानपूर, कोटगूल इत्यादी मार्गावरील सुमारे २० बसफे-या आजपासून बंद केल्या आहेत. बंददरम्यान आज नक्षल्यांनी अहेरी तालुक्यातील देचलीपेठा उपपोलिस ठाण्यांतर्गत सिंधा येथे शहीद स्मारक उभारले होते. तसेच कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा नजीकच्या येडसकुही येथे नक्षल्यांनी बॅनर बांधले होते. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
GVT63
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना