![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली-राजनांदगाव या आंतरराज्यीय महामार्गावर सावरगावच्या उत्तरेस कोटगूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर न्याहाकल गावाच्या पायथ्याशी टिपागड आहे़ टिपागड ही एक उंच टेकडी असून,गडावर चढण्यासाठी सुमारे एक हजार फूट उंच चालत जावे लागते़ हा मार्ग वळणाचा आहे़ टेकडीवर गर्द वनराई आहे़ सागवान, बिजा, हिरडा, बेहडा,बांबू असे नानाविध प्रकारचे वृक्ष तेथे आढळतात़ विशेष म्हणजे, गडावर एक विस्तीर्ण तलाव आहे़ हा तलाव खोल असून, भर उन्हाळ्यातही त्यात भरपूर पाणी असते़ या तलावात उतरण्यासाठी दगडांच्या पायऱ्या बनविण्यात आल्या आहेत़ गडाच्या भिंती दगडांच्या असून, बुरुजांनी सुरक्षित आहेत़ तलावाच्या दक्षिणेस पठारावर किल्ला असून, या किल्ल्याला परकोटही आहे़ किल्ल्याच्या आत राजवाडा बांधलेला आहे़ तलावाच्या दक्षिणेस 200 फूट गुरुबाबा ॠषीमूनीची समाधी आहे़ टिपागडच्या राजाने आपल्या राणीला आंघोळ करण्यासाठी या तलावाची निमिर्ती केल्याची आख्यायिका सांगितली जाते़ |