बुधवार, 8 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात

Wednesday, 4th November 2015 07:36:04 AM

 

गडचिरोली, ता.४:एका इसमावर सौर ऊर्जा प्लेट चोरी केल्याचा आरोप लावून त्याला गुन्हयात अटक न करण्यासाठी त्याच्याकडून ५ हजारांची लाच स्वीकारताना आज कोरची पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अनिल बंसीलाल चाटुरे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून अटक केली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, शासनाने कोरची ग्रामपंचायतीला पुरविलेल्या सौर ऊर्जेच्या प्लेटची काही दिवसांपूर्वी चोरी झाली. याविषयीची तक्रार ग्रामपंचायतीने कोरची पोलिस ठाण्यात केली. याच दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रालाही शासनाने सौर ऊर्जेच्या प्लेट पुरविल्या होत्या. मात्र ग्रामपंचायतीप्रमाणेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्लेटची चोरी होऊ नये म्हणून संबंधित इसमाने त्या प्लेट आपल्या घरी नेऊन ठेवल्या होत्या. दरम्यान पोलिस उपनिरीक्षक अनिल चाटुरे ग्रामपंचायतीने केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याकरिता गावात गेले. यावेळी त्यांना तक्रारकर्त्याच्या घरी सौर ऊर्जेच्या प्लेट दिसल्या. तेव्हा पीएसआय चाटुरे यांनी ग्रामपंचायतीच्या चोरी झालेल्या प्लेट तुझ्या घरी सापडल्या, तूच चोरी झालेल्या सौर ऊर्जेची बॅटरी विकत घेतली, असा आरोप तक्रारकर्त्यांवर केला. त्यानंतर चाटुरे याने तक्रारकर्त्यास चोरीच्या गुन्हयात अटक न करण्यासाठी त्याच्याकडून २० हजार रुपयांची मागणी केली. शेवटी तडजोडीअंती तो ५ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला.परंतु लाच देण्याची कंत्राटदाराची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळयाचे आयोजन करुन आज पोलिस उपनिरीक्षक अनिल चाटुरे यास तक्रारकर्त्याकडून ५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजीव जैन, उपअधीक्षक किशोर सुपारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, डी.डब्लू.मंडलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, पोलिस नाईक रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, नरेश आलाम, मिलिंद गेडाम, देवेंद्र लोनबले, महेश कुकुडकर, गणेश वासेकर, सोनल आत्राम, उमेश मासुरकर, स्वप्नील वडेट्टीवार आदींनी ही कारवाई केली. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
H4RAC
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना