शुक्रवार, 10 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

भाजप तयार करणार सर्वसमावेशक जाहिरनामा

Thursday, 18th September 2014 05:30:31 AM

 
गडचिरोली, ता़१८
१५ आॅक्टोबर रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष समाजातील सर्व घटक व क्षेत्रांतील प्रश्नांचा समावेश असलेला जाहिरनामा प्रकाशित करणार असून, त्याअनुषंगाने २० सप्टेंबरला ‘लोकसंवाद’ कार्यक्रम आयोजित करणार असल्याची माहिती खा़ अशोक नेते यांनी आज (ता.१८) पत्रकार परिषदेत दिली़
खा़ नेते यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजप जाहिरनामा घेऊन मतदारांपर्यंत पोहचणार आहे़ या जाहिरनाम्यात सर्व जाती, धर्माचे प्रश्न, तसेच समाजातील विविध घटकांच्या समस्या व त्यांच्या विकासासाठी करावयाचे कार्य या बाबींचा समावेश असणार आहे़ त्याअनुषंगाने येत्या २० सप्टेंबरला दुपारी ३ वाजता गडचिरोली येथील प्रेसक्लब भवनात ‘लोकसंवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे़ या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्त, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, महिला, नोकरदार व व्यापारी संघटना, डॉक्टर्स यांच्यासह बारा बलुतेदारांना बोलावण्यात येणार आहे़ या सर्व संघटनांच्या प्रतिनिधी भूमिका जाणून घेणार असून, त्यांचा समावेश जाहिरनाम्यात करण्यात येणार आहे़ उपरोक्त संघटनांच्या प्रतिनिधींनी २० सप्टेंबरला उपस्थित राहावे, असे आवाहनही खा़नेते यांनी केले़
पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, प्रदेश सदस्य बाबूराव कोहळे, शहराध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, गजानन येनगंधलवार, अनिल पोहनकर, डेडूजी राऊत, विलास भांडेकर, डॉ़ भारत खटी, अनिल कुनघाडकर, दत्तू माकोडे, अविनाश विश्रोजवार उपस्थित होते़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
GBPHE
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना