मंगळवार, 16 जानेवारी 2018
लक्षवेधी :
   धानोऱ्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या, नागरिक भयभीत             सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्याची अफरातफर, देसाईगंज पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल             पतंगाच्या मांजामुळे दोघे जण जखमी-गडचिरोलीतील घटना           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%

तरुण मुलाने फोडला वृद्ध आईचा डोळा

Tuesday, 19th December 2017 12:05:56 AM

कुरखेडा, ता.१९: घरगुती वादातून एका पुत्राने आपल्या वृद्ध मातेवर काठीने प्रहार केल्याने तिच्यावर डोळा गमावण्याची पाळी आल्याची संतापजनक घटना आज सकाळी सात वाजताचे सुमारास देसाईगंज तालुक्यातील कसारी येथे घडली. 

कौसल्याबाई विनायक म्हस्के (६०) रा.कसारी असे जखमी मातेचे नाव आहे आरोपी मुलगा नरेश विनायक म्हस्के याने आज सकाळी सात वाजताच्या सुमारास आपल्या जन्मदात्रीला काठीने मारहाण केली. यात तिच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. मुलांसाठी अश्रू वाहणाऱ्या मातेच्या डोळ्यातून रक्ताश्रू वाहू लागल्याने जखमी मातेला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोळ्याला गंभीर इजा झाली असल्याने प्रथमोपचार करुन संदर्भ सेवेसाठी तिला गडचिरोलीला रवाना केल्याची माहिती डॉ.सावसागडे यांनी दिली


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K4JKA
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना