/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली : हळद लागवडीसाठी क्षेत्रवाढ प्रक्रिया मूल्यसंवर्धन व बाजार व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष पुढाकार घेतला जाणार आहे. या संदर्भातील निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकत्याच पार पडलेल्या हळद लागवडीबाबतच्या बैठकीत अधिकार्यांना दिले आहे.
बैठकीला आत्माचे प्रकल्प संचालक अनंत पोटे, जि.प. चे कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर, व्ही. बी. महंत, प्रा. योगिता सानप, डॉ. पी. एस. नेहरकर, डॉ. प्रशांत सोळूंखे, डॉ. सुधीर बोरकर आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत २७ हेक्टर या प्राप्त लक्ष्यांकानुसार क्षेत्र विस्तारासाठी गाव, शेतकर्यांची समुह पध्दतीने निवड करणे, शिफारस केलेल्या पीडीके व्ही वायगाव वाणाचे बियाणे उपलब्ध होईपर्यंत स्थानिकरित्या तयार केलेले उत्कृष्ट बियाणे बीज प्रक्रिया करून वापरण्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पत्र देण्याबाबत प्रत्यक्ष शेतावर तंत्रज्ञ प्रात्यक्षिकाचे आयोजन करणे, कृषी विद्यापीठाकडून हळद काढणी यंत्र उपलब्ध करून शेतकरी गटास प्रात्यक्षिक स्वरूपात देण्याबाबत कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. या बरोबरच दर्जेदार उत्पादनासाठी शास्त्रीय प्रक्रिया पध्दतीचा अवलंब अवलंब करून पीडीकेव्हीने विकसीत केलेल्या एकात्मिक हळद प्रक्रिया युनिट जिल्ह्यातील हळद उत्पादन गटांना उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले.