बुधवार, 8 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

टाटा सुमो उलटली; बालंबाल बचावले गडचिरोलीचे एसडीपीओ प्रनिल गिल्डा

Saturday, 27th March 2021 06:31:44 AM

गडचिरोली,ता.२७: शहरातील कारगिल चौकात आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोलिस अधिकाऱ्याच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रनिल गिल्डा हे थोडक्यात बचावले.

गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी पाच दिवसांपूर्वीच आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. आज दुपारी ते आपला अंगरक्षक व वाहन चालकासह टाटा सुमोने जिल्हा पोलिस मुख्यालयाकडून शहरातील आपल्या कार्यालयाकडे परत येत होते. परंतु कारगिल चौकाजवळ ट्रकला ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमो रस्ता दुभाजकावर आदळून उलटली. मात्र, एसडीपीओ श्री.गिल्डा थोडक्यात बचावले. चालक व अंगरक्षकाला किरकोळ दुखापत झाली आहे. यावेळी उपस्थित उदय धकाते, महेंद्र वाघमारे ,बादल आरेकर आणि नंदू कुमरे आदींनी पोलिसांना वाहनातून काढण्यासाठी मदत केली. मुख्य म्हणजे ट्रक चालकाची कोणतीही चूक नसतांना त्याला नागरिकांनी मारहाण केली.

रस्त्याची रुंदी कमी केल्याने अपघातात वाढ

गडचिरोली-चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले आहेत. आता गडचिरोली-चामोर्शी या मार्गाचे काम सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गाची रुंदी किती असावी, याचे काही निकष आहेत. परंतु शहरातील रस्त्यांवरच्या इमारती पाडाव्या लागतील, म्हणून महामार्गाची रुंदी कमी करण्यात आली. परिणामी राष्ट्रीय महामार्ग अरुंद झाले असून, त्याची परिणती अपघातांत होत आहे. सिमेंट काँक्रिटच्या पक्क्या रस्त्यांवर चक्क सायकलची चाके उमटली आहेत, इतके दर्जेदार काम या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाचे झाले आहे. काम करताना ६०-७० वर्षांपासूनचे मोठे वृक्ष तोडण्यात आले. परंतु गेल्या दीड वर्षांत रस्त्याच्या कडेला साधे गुलमोहराचे झाडही लावण्यात आले नाही.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
LHA40
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना