बुधवार, 26 जानेवारी 2022
लक्षवेधी :
  दुर्गम भागातील नागरिकांनी लोकशाही मूल्ये आणि विकासाला अंगीकारल्याने गडचिरोली जिल्ह्याची परिस्थिती बदलत आहे: प्रजासत्ताकदिन कार्यक्रमात राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन             गडचिरोली जिल्ह्यातील ७ पोलिसांना पोलिस शौर्य पदक, तर दोन अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलिस पदक जाहीर             लसीकरणात गडचिरोली जिल्हयाची ३१ व्या क्रमांकावरून १६ व्या क्रमांकावर झेप-आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी केले अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतूक             गडचिरोलीत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा, नवमतदारांना जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचे वाटप             २५ जानेवारी कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्हयात ४३ जण बाधित, २०१ रुग्ण कोरोनामुक्त           

रुपाली पंदिलवार गडचिरोली जिल्हा महिला काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष

Friday, 31st December 2021 08:09:03 AM

गडचिरोली,ता. ३१: अखिल भारतीय महिला कांग्रेसच्या अध्यक्षा नेटा डिसूज़ा व महाराष्ट्र प्रभारी ममता भूपेश यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची पहिली यादी जाहीर केली असून, गडचिरोली जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज २०२१ या वर्षाअखेर महिला काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात ८ उपाध्यक्ष, २० सरचिटणीस, ३७ सचिव, १७ प्रदेश कार्यकारिणी सदस्य, तसेच सल्लागार परिषदेच्या सदस्य, सिंधी समाज, पारधी समाज समन्वयक आणि जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे.

महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव म्हणून गडचिरोली येथील डॉ.चंदा कोडवते यांना पुन्हा स्थान देण्यात आले आहे. मात्र, विद्यमान जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे यांना पदावरुन दूर करीत आष्टी येथील जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंदिलवार या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात. मावळत्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे यांनी सात-आठ वर्षांपूर्वी शिवसेना व त्यावेळची युवा शक्ती संघटना सोडून काँग्रेसमध्ये घेतला होता. त्यांनी जिल्ह्यात महिला काँग्रेसची चांगली मोट बांधली होती. त्यामुळे त्यांना किमान प्रदेश कार्यकारिणीत समाविष्ट करुन घेणे अभिप्रेत होते. परंतु त्यांना कुठेही स्थान देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
D2PZH
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना