/* */
रविवार, 22 मे 2022
लक्षवेधी :
  वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश             कमलापूचे हत्ती जामनगरला नेण्याच्या विरोधात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन, तर भाजपने केला चक्काजाम             गडचिरोली येथे आरमोरी रोड आणि कारमेल हायस्कूलच्या मागे दोन प्रशस्त घरे विकावयाची आहेत: संपर्क: ९४०५१४३६७०           

गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध:किशोर पोतदार

Friday, 1st April 2022 07:35:26 AM

गडचिरोली,ता.१: छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जोपासून जनतेच्या कल्याणासाठी शिवसेना कार्यरत आहे. गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध असून, नागरिकांनीही शिवसेनेच्या विचारधारेशी जुळून सेवेची संधी द्यावी, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांनी केले.

गडचिरोली तालुक्यातील टेंभा व मौशीचक येथे शिवसेना सह संपर्कप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंद कात्रटवार यांच्या पुढाकाराने आयोजित शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अरविंद कात्रटवार म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रुपाने राज्याला विकासपुरुष लाभला आहे. मुख्यमंत्री विविध कल्याणकारी योजना राबवीत असून, समाजातील दुर्बल घटकांचा विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनतेने राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कात्रटवार यांनी याप्रसंगी केले.

याप्रसंगी सह संपर्कप्रमुख विलास कोडापे, जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, जिल्हा संघटक विलास ठोंबरे, शिवसेना चामोर्शी (ग्रामीण) तालुकाप्रमुख पप्पी पठाण, चामोर्शी तालुकाप्रमुख अमित यासलवार, उप तालुकाप्रमुख यादव लोहंबरे, स्वप्निल खांडरे, संदीप भुरसे,निकेश लोहबरे, राहुल सोरते, अमित बानबले, दिलीप चनेकार, तुलाराम मुनघाटे, हरीश बानबले, तानाजी आतबले, मुकेश नैताम, राकेश मुनघाटे, भोजराज धकाते, रुपेश बानबले, भगवान चनेकार, रेमाजी मुनघाटे, नाना चुधरी, अंबादास मुनघाटे, माणिक वाघाडे, राकेश चिंचोलकर, किशोर देशमुख,विनोद सयाम, चरण देशमुख, प्रकाश तुराटे, जगन्नाथ ठाकरे, गोपाल हुलके, राजेंद्र शिडाम, महेश तिवाडे, गिरीधर निलेकार, सत्यवान कोहपरे, जगदीश सालोटकर,संजय उसेंडी, अरुण बुरेवार, अनंत हुलके, उमाकांत ठाकरे यांच्यासह टेंभा व मौशीचक परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4EK25
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना