बुधवार, 8 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, १६ मार्ग बंद

Monday, 12th September 2022 05:26:13 AM

गडचिरोली,ता.१२: जिल्ह्यात सर्वदूर काल रात्रीपासून आज दुपारपर्यंत मुसळधार पाऊस पडल्याने १६ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.

मागील चोवीस तासांत गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक ११७.१ मिलीमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल धानोरा तालुक्यात ११५.९ आणि कोरची तालुक्यात ११३.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने काल रात्रीपासूनच भामरागड-आलापल्ली मार्ग बंद आहे.

शिवाय गडचिरोली-धानोरा, कुरखेडा-कोरची, असरअली-सोमनपल्ली या प्रमुख मार्गांसह गडचिरोली-गुरवळा, माडेमूल-रानमूल, चांदाळा-कुंभी, धानोरा-सोडे, पेंढरी-पाखांजूर, साखेरा-कारवाफा, पोटेगाव-देवापूर, साखरा-चुरचुरा, बामणी-उसेगाव, धानोरा-चातगाव, टेकडाताला-कंबलपेठा, असरअली-सोमनपल्ली एकूण १६ मार्गांवरील वाहतूक बंद झाली आहे. धानोरा येथे पंचायत समितीजवळ एक मोठे झाड कोसळल्याने वीज तारा तुटल्या. मात्र, यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

दरम्यान, तेलंगणा राज्यातील मेडिगड्डा प्रकल्पाचे सर्व ८५ दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून ८ लाख ४६ हजार ७१० क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे सिरोंचा तालुक्यात पुन्हा पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
JAVAZ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना