मंगळवार, 7 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

अक्षय भालेरावच्या हत्येच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीची निदर्शने

Tuesday, 6th June 2023 07:30:55 AM

गडचिरोली, ता. ६: नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता अक्षय भालेराव याची जातीयवादी गावगुंडांनी हत्या केली. या घटनेचा निषेध करीत हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी,या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, महासचिव योगेंद्र बांगरे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, जिल्हा उपाध्यक्ष जी.के.बारसिंगे, महिला आघाडीच्या नेत्या माला भजगवळी, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलकांनी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणीकेली. शिवाय भारतीय महिला खेळाडूंवर लैंगिक अत्याचार करणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांना तत्काळ अटक करावी,मुंबई प्रदेश वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी परमेश्वर रणशूर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी इत्यादी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.यावेळी उपस्थित वंचितच्या पदाधिकारी वकार्यकर्त्यांनी जिल्हाधिका-यांमार्फत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले.

या आंदोलनात जिल्हा संघटक धमेंद्र गोवर्धन, शहर महासचिव सोनलदीप देवतळे, संघटक भारत रायपुरे, विलास केळझरकर, कृष्णा रोहनकर,सूरज खोब्रागडे, कवडू दुधे, बिपीन सूर्यवंशी, शकुंतला दुधे, जावेद शेख, शोभा शेरकी, श्वेता बोरकुटे, वंदना येडमे, सोनम साळवे, शिल्पा दुर्गे, पूजा साखरे, तेजराम नेतनकर, गजानन मेश्राम, किशोर जाधव, वासुदेव मेश्राम,सुजाता वासनिक, कैलास खोब्रागडे सहभागी झाले हीते.  



तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
7E5GZ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना