/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२०:अतिदुर्गम व मागास असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांबाबत सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे सांगत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह अन्य नेत्यांना जिल्हावासीयांच्या प्रश्नांवर विधीमंडळात आवाज उठविण्यासाठी साकडे घातले.
महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अभिजित वंजारी व आमदार सुधाकर अडबाले यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध समस्या अवगत केल्या. या समस्यांवर सभागृहात आवाज उठवावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
पक्क्या रस्त्यांची निर्मिती होईपर्यंत सुरजागड लोहखाणीतून होणारी लोहखनिजाची वाहतूक बंद करावी, तलाठी व वनरक्षक भरतीत जिल्ह्यातील गैरआदिवासी समाजासाठी पदसंख्या वाढवून देण्यात यावी, निवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर कामावर घेण्याऐवजी पात्र सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीत प्राधान्य द्यावे,रिक्त पदांची तातडीने भरती करुन स्थानिकांना संधी द्यावी,मेडिगड्डा धरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सरकारने ठोस पावले उचलावी इत्यादी मागण्या ब्राम्हणवाडे यांनी केल्या. यावर सभागृहात आवाज उठविण्याचे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ.अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले यांनी दिले.