/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२२: भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर प्रशांत वाघरे यांचे आज शहरात प्रथमच आगमन झाले. यानिमित्त पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
सर्वप्रथम शहरातून रॅली काढल्यानंतर जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, खासदार अशोक नेते, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे यांचा मोठा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हा महासचिव रवींद्र ओल्लालवार, गोविंद सारडा, अनुसूचित जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, ज्येष्ठ नेते सुधाकर येनगंधलवार, अनिल पोहनकर, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, केशव निंबोड, माजी नगरसेविका वर्षा शेडमाके, चामोर्शीचे नगरसेवक आशिष पिपरे, चामोर्शीचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, ओबीसी नेते भास्कर बुरे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, अॅड. उमेश वालदे, भाजयुमोचे नेते अनिल तिडके, प्रशांत अलमपटलावार, विनोद देवोजवार, अविनाश पाल यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अंत्योदयाचा विकास हेच ध्येय: प्रशांत वाघरे
जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर आज प्रशांत वाघरे यांनी पत्रकार परिषद घेतली. केंद्र व राज्य सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत म्हणजेच अंत्योदयापर्यंत पोहचून त्यांचा विकास व्हावा, हेच आपले ध्येय असल्याचे प्रशांत वाघरे यांनी सांगितले. कार्यकर्ता हीच पक्षाची ताकद असून, त्यांना जपण्याचे काम करु. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबरोबरच आधी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पक्षाला यश मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे वाघरे यांनी सांगितले.